आरोग्य विभागाच्या योजना


महिला,अपंग,दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती,आर्थिकस्थीति कमकुवत असलेल्या व्यक्ती महिला धोरण अंतर्गत स्त्रियांचा सामाजिक,मानसिक शारीरिक दर्जा सुधारणे,बाळ जिवित व सुरक्षित मातृत्वाच्याकार्यक्रमाचा प्रचार करणे,राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत छोट्या कुटुंबाचा स्वीकार होवून त्या अनुशंगाने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने विविध योजना राबवितात.

योजनेचे स्वरूप व लाभार्थ्यासाठी निकष व अटी-

१.जननी सुरक्षा योजना-

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेच्या ऐवजी जननी सुरक्षा योजना सन २००५-२००६ पासून ग्रामीण भागात कार्यान्वित केली आहे.या अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणारया प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व मत मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे असा आहे.

पात्रता-
१.ग्रामीण भागातील सदर गर्भवती महिला अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीची असावी त्याव्यतिरिक्त 
२.गर्भवती महिला हि दारिद्र्य रेषेखालील असावी.
३.सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १८ वर्षे असावे.
४.सदर योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंत देय राहील.

लाभाचे स्वरूप-:

१.ग्रामीण भागातील रहिवाशी लाभार्थीस संस्थेत प्रसूतीसाठी आल्यानंतर रु.७००/-एक रकमी प्रसुतीनंतर सात दिवसाचे आत देण्यात यावे.
२.जननी सुरक्षा योजना लाभार्थींना संस्थेमध्येच प्रसूती करण्याविषयी सेर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येऊन परंतु अपवादात्मक स्थिती मध्ये प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेचा लाभ रु.५००/- इतका देण्यात येते.३.लाभार्थीला द्यावयाचे अनुदान हे धनाकर्ष द्वारे वितरीत करण्यात येईल.४.या योजनेंतर्गत सिझेरियन शास्राक्रिया झालेल्या लाभार्थीला रु.१५००/- इतके अनुदान लाभार्थीने रुग्णालयामधील पावत्या दिल्यानंतरच पावत्यानुसार रक्कम देण्यात येईल.एकूण पावतीच्या रक्कमपैकी रु.१५००/-मर्यादेपर्यंत अथवा कमी देयक असेल तर तेवढे अनुदान लाभार्थीला देण्यात येईल.सदरची रक्कम संस्थेला न देता थेट लाभार्थीला देण्यात येते.


Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja