पॅन कार्ड


जो वित्त विभागाद्वारे १० अंकीय वर्णक्रमिक म्हणजे शब्द व संख्याचे मिळून तयार केलेला असतो.जो क्रमांक व्यक्तीला नोंदणी पुर्नेतेनंतर प्रदान केला जातो तो म्हणजे पॅन कार्ड नंबर होय.

पॅन कार्ड मिळण्याचा कालावधी २१ दिवस असतो.

१.कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी उदा.प्लॉट,जमीन,घर खरेदी-विक्री,वाहन खरेदी-विक्री,बँकिंग व्यवहार,पोस्टातील आर्थिक व्यवहार,विदेश यात्रा इ.

२.बंकेत नवीन खाते उघडण्यासाठी इ.विविध कारणांसाठी 
३. आय कर भरणा फाईल करण्यासाठी. 
४.वर्ष २००५ पासून आयकर विभागाशी पत्र व इ. व्यवहार करण्यासाठी 
५. टेलिफोन कनेक्शन प्राप्त करण्यासाठी.

पॅन कार्ड कसे प्राप्त कराल.

स्थानिक कर सल्लागार यांचे कडील फॉर्म नं. ४९ ए काटेकोरपणे भरून सादर करावा.सदर फॉर्म बरोबर खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

१.दोन स्वच्छ नजीकच्या काळातील काढलेले रांगेत फोटो ३.५ बाय २.५ साईज.

२.शिधापत्रिका ३. मतदान कार्ड झेरॉक्स ४. शाळेचा दाखला.

वरील तीन पेकी कोणतेही दोन कागदपत्रे आवश्यक आहे.

वरील कागदपत्रांमध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता अचूक असणे आवश्यक आहे.जर वरील कागदपत्रांमध्ये नावात पत्त्यात चूक झालेली असेल तर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुक झेरॉक्स व त्यावरील व्यवहाराचे झेरॉक्स जोडावी.

व्यक्ती अशिक्षित असेल तर अंगठा निशाणी हि नोटरीद्वारे प्रमाणित करण्यात यावी व त्यांचा सही शिक्का घेण्यात यावा.

पॅन कार्ड हरविल्यास काय कराल

पॅनची झेरॉक्स प्रत किंवा क्रमांक असणे आवश्यक किंवा जन्म दिनांक व हरविलेल्या पॅन वरील अचूक नाव जर नसेल तर पुन्हा पॅन कार्डसाठी आवेदन करावे लागते.तेव्हा नविन पॅन क्रमांक प्राप्त होतो.जर हरविलेले पॅन कार्ड पुन्हा सापडले तर दोन्ही पेकी एक पॅन कार्ड रीतसर अर्जाद्वारे बाद करावे.तसे न केल्यास १० हजार दंड आकारण्यात येतो.

    पॅन कार्ड काढण्यासाठी आता झेरॉक्स सोबत ओरीजनल कागदपत्र दाखवणे अनिवार्य आहे.

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja