वाहन नोंदणी / व्हेईकल रजिस्ट्रेशन


कोणत्याही वाहन विक्रेत्यास वाहन नोंदणी शिवाय वाहन विकता येत नाही.प्रत्येक वाहन विक्रेत्याकडे मिळणारे वाहन हे तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी वाहन नोंदणी केलेले असते. डीलर कडून नविन वाहन घेतल्या नंतर ७ दिवसाच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक आहे.नोदणी न केलेले वाहन वापरू नये.प्रत्यक्ष वाहन विक्रेत्याकडून वाहन घेताना किंवा घेतल्यावर ते पक्के बिल वाहन प्रमाणपत्र घ्यावे.वाहन नोंदणीचे वेळी नियमाप्रमाणे आर टी ओ यांचे समोर जे वाहन नोंदवायचे आहे ते प्रत्येक्ष सादर करावे.

वाहन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

    फॉर्म क्र २० व वाहन विक्रेत्याकडून सेल सर्टिफिकेट फॉर्म क्र २१
    कंपनीचे वाह्ना संबंधीचे मार्ग योग्यता रोडवर्दीनेस प्रमाणपत्र
    वाहतूक मान्यता प्रमाणपत्र व खरेदी कर पावती
    तात्पुरती वाहन नोंदणी प्रमानपत्र
    पॅन कार्ड क्र किंवा अर्ज क्र ६० दोन प्रतीत
    प्रमाणित विमा प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र स्टॅम्प
    नगरपालिका जकात भरल्याची पावती
    शेतीसाठी उपयुक्त वाहन नोंदणीसाठी उदा.ट्राक्टर,ट्रेलर ७/१२ उतारा.

———————————————————————————

दुय्यम मालकी वाहन नोंदणी

    एकाच कार्यक्षेत्रातील असेल तर १४ दिवस
    जर दुसरया कार्यक्षेत्रातील असेल तर ३० दिवस
    फॉर्म २९ विक्रेत्याचे प्रतिज्ञापत्र
    फॉर्म क्र ३० खरेदी करणार यांचे प्रतिज्ञापत्र
    फॉर्म क्र २९ वाहन आकारणी सुल्कासह कार्यक्षेत्राबाहेरील वाहन असल्यास नाहरकत दाखला,पी यु सी सर्टिफिकेट,विमा प्रमाणपत्र,वाहन नोंदणी प्रमाणपत्र,कर प्रमाणपत्र.

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja