जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे


आपली शेत जमीन ,प्लॉट इ. कायदेशीर कसा आहे हे प्रमाणित करण्यासाठी जमीन मोजणी करून घेणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणे,प्रमाणित जमीन वाटप ,हक्क ठरविणे.इ. कामांकरिता जमीन मोजणी आवश्यक असते. जमीन मोजणी करीत ३ पद्धती आहेत यातील सर्वांसाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असून फक्त जमीन मोजणीचा कालावधी कमी होतो. जितक्या तातडीने जमीन मोजणी करायची आहे त्या प्रमाणपत्रात शासकीय फी भरावी लागते. जमीन मोजणीसाठी तालुका भूमी अधिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप  सह.

. गाव नमुना ७/१२ चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा.

. मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.

. मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा ,अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.

. लगत खातेदारांचे नाव व पत्ता.

महत्वाच्या सूचना

१ शासकीय जमीन मोजणी करते वेळी त्याची चित्रफित शक्य झाल्यास काढून ठेवावी.

२.कालांतराने हद्दी संबंधी वाद निर्माण झाल्यास चित्रफित / व्हीडीओ शुटींग महत्व्याचा पुरावा म्हणून मांडता येतो.

३.जमीन किंवा प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावे.

४. प्लॉट किंवा जमीन खरेदी करते वेळी शासकीय जमीन मोजणी करूनच विकत घ्यावे.

त्यामुळे पुढे शेजारील व्यक्तींचा किंवा त्या जमिनीच्या वारसांचा त्रास होत नाही.

५. साधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अति तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.


Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja