85 टक्के कर्ज शेतजमिन खरेदीसाठी आता स्टेट बॅंक देणार

85 टक्के कर्ज शेतजमिन खरेदीसाठी आता स्टेट बॅंक देणार आज मी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेवून आलोय.आज आपण स्टेट बॅंकेच्या भू खरेदी म्हणजेच शेतजमिन खरेदी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला शेती करायची आहे पण शेतजमिन नाही काळजी करु नका. चला तर पाहू काय आहे ही योजना, आता आपण सविस्तर जाणून घेवूया.
 

१. स्टेट बॅंकेची भू खरेदी योजना नक्की काय आहे. या योजनेसाठी कुणाला करता येईल अर्ज. काय आहेत अटी यासाठी. शेतजमिन खरेदीसाठी कीती मिळेल कर्ज. कीती आहे कालावधी कर्ज फेडण्याचा. कीती महिन्यांनी असतात कर्जाचे हफ्ते. रिपेमेंट करण्यासाठी कीती वर्षाचा वेळ दिला जाईल. तर मित्रांनो जाणून घेवूया या सातही प्रश्नांची उत्तरे साध्या व सोप्या भाषेत. त्यासाठी हा माझा व्हिडिओ सुरवाती पासून शेवटपर्यंत पहा. आणि शेतजमिन खरेदीसाठी मिळवा आता ८५ टक्क्यापर्यंत कर्ज. चला तर जाणून घेवूया या सा-या प्रश्नांची उत्तरे. 

२. तर मित्रांनो तुमच्याकडे शेतजमिन नाही. पण तुम्हाला शेतीत नवनविन प्रयोग करायला आवडतं. शेती करायला आवडते. मग काळजी करु नका. स्टेट बॅंकेने आणलीयं तुमच्यासाठी भू खरेदी योजना. तुम्हाला जर शेती करायची असेल आणि तुमच्याकडे जमीन नसेल तर काळजी करण्याचे काही कारणच नाही. तुम्ही एसबीआयच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. भारतीय स्टेट बँक आता शेतजमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन शेतजमीन खरेदी करू शकता. 

३. काय आहे स्टेट बॅंकेची भू खरेदी योजना?    छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा SBI चा उद्देश आहे. याशिवाय जे शेतकरी सध्या शेती करताहेत पण भूमिहीन आहेत. असे शेती करणारे भूमिहीन लोक सुद्धा शेतजमीन खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

४. हे लोक करू शकतात अर्ज ज्या लोकांकडे 5 एकरपेक्षा कमी असिंचित जमीन म्हणजेच जिरायत जमीन आहे. तसेच 2.5 एकर पर्यंत सिंचित जमीन म्हणजेच बागायती जमीन असणारे लोक देखील या भू-खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात. याशिवाय इतरांच्या शेतात काम करणारे भूमिहीन लोक सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाची कर्ज फेडीची नोंद असणं आवश्यक आहे. SBI दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर देखील विचार करू शकते. पण त्यांच्यावर इतर बँकांचे कर्ज असू नये ही अट आहे. 

५. किती मिळेल कर्ज या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचे मुल्यांकन बँक करणार आहे. त्यानंतर बॅंक जमिनीच्या एकूण किमतीपैकी 85 टक्के कर्ज देऊ शकते. या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे राहणार आहे गहाण. अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात दिली जाईल. म्हणजेच जो पर्यंत तुम्ही सगळे कर्ज फेडत नाही तोपर्यंत जमिन बॅंकेच्याच ताब्यात राहील. 

६. इतका आहे कर्ज फेडण्याचा कालावधी? या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष मिळतात. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्याला कर्जाचे हप्ते फेडावे लागतात. 9 ते 10 वर्षात तुम्ही संपुर्ण कर्ज फेडू शकता. खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो. पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रीपेमेंट सुरू करण्यासाठी 2 वर्षाचा वेळ दिला जातो. म्हणजेच जर तुम्ही घेतलेल्या जमिनीत तुम्हाला लगेच शेती करता येत नसेल तर कर्जफेडीसाठीचे हफ्ते दोन वर्षानंतर सुरु करता येतात. 

७. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समधुन लिहायला विसरु नका. तुमचे काही प्रश्न असतील तर बिंधास विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कार, शेअर करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाचा असल्यानं महाराष्ट्रातल्या तमाम शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांकडे फॉरवर्ड करा. माझे अशाच प्रकारचे नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महारा

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja